Breaking News

आष्टीच्या कोविड सेंटरमध्ये रुग्ण कीर्तनात दंग..!रुग्णालयात कोरोनाग्रस्तांचा अनोखा उपक्रम 

के. के. निकाळजे । आष्टी

एकीकडे जगावर ओढावलेल्या महाभयंकर कोरोना रोगामुळे नागरिक हैराण असताना दुसरीकडे माञ यावर मातकरण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी "मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण।।या अभंगा प्रमाणे ,रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आष्टी येथील कोव्हीड सेंटर मध्ये किर्तन सेवेच्या माध्यमातून रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे काम सुरु आहे.

विशेष म्हणजे या किर्तनातून रुग्णामध्ये  पोसिटीव्ह एनर्जी वाढत अहाल्याने कोरोनवर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती तयार होत असल्याचे एकंदरीत चिञ दिसत आहे.डाॕ.अमित डोके हे आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवा देण्याचे काम करत असून सध्या कोरोनाच्या काळात ते कोव्हीड सेंटर वरती आपली सेवा बजावित आहेत. विशेष म्हणजे हि सेवा करत असताना मनामध्ये कसलीही भिती न बाळगता ते कोरोनाग्रस्त रुग्णांना प्रसन्न कसे ठेवता येईल यासाठी दर आठ दिवसाला किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत अनेक विनोदी किस्से सांगत विनोदाचार्याची भूमिका बजावून ते या रुग्णांना असणारी कोरोनाची धास्ती दुर करण्यास प्रभावी मार्गदर्शन करत असल्याने अनेक भयभीत असणारे आणि वयस्कर रुग्ण देखील त्यांच्या या किर्तनाने प्रफुल्लीत होत असल्याचे चिञ आहे.


गुरुवारी सायंकाळी देखील अशीच किर्तन सेवा देत असताना कोरोनाग्रस्त असणारी वयोवृद्ध महिला देखील अमित डोके यांच्या किर्तनात दंग होऊन अक्षरशः ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात भान हरवून नाचत असल्याचे दिसून आले.त्यामुळे विठू नामाच्या गजरात कोरोनामुक्तीचा हा आष्टी पॕटर्न सर्वञ चर्चेचा विषय ठरत आहे. डाॕ. अमित डोके यांना त्यांचे वैद्यकीय सहकारी डॉ. राहूल टेकाडे सर, डॉ संतोष कोठुळे, डॉ.  गुट्टे, वाळके, नागेश कारंडे, मिलिंद सरपते, डॉ. नितीन मोरे, ज्ञानदेव सुंबरे, रवी माने, दिपक कुंदे, अमोल रसायली आदी हि सेवा देण्यास सहकार्य करीत आहेत.No comments