Breaking News

डिजिटल मीडिया संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी गंगाधर काळकुटे
बीड :  असोसिएशन आॅफ डिजिटल मीडिया अॅण्ड इंडिर्पेंडंट न्युज पोर्टल्यस (ADMIN) संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदी गंगाधर काळकुटे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडी बद्दल संपुर्ण राज्यातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.सध्या सोशल मीडिया वापरणार्यांची संख्या मोठी झाली आहे, धावपळीच्या जीवनात एका क्लिकवर नागरिकांना बातम्या जाव्यात यासाठी दैनिकांनी आता न्युज पोर्टलवर भर दिला आहे. कोरोना मध्ये तर न्युज पोर्टलच्या माध्यमातुन सर्वांच घर बसल्या सर्व घटना समजत होत्या, यामुळे आता न्युज पोर्टलला खुप महत्व वाढले आहे. लवकर सरकार न्युज पोर्टलला सुद्धा जाहिराती देण्याच्या तयारीत आहे. असोसिएशन आॅफ डिजिटल मीडिया अॅण्ड इंडिर्पेडंट न्यूज पोर्टल्सच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे. आॅनलाईन व न्युज पोर्टलच्या माध्यमातुन राज्यातील समस्या व महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहु, असे मतही यावेळी गंगाधर काळकुटे यांनी व्यक्त केले. यासह मोबाईलवर एका क्लिकवर महत्वाची माहिती व विशेष बातम्या देऊ असे गंगाधर काळकुटे म्हणाले. संस्थापक अध्यक्ष अॅड.अद्वैत चव्हाण, सचिव एम.व्ही.हरणे व सूर्योदय टिमने त्यांचे अभिनंदन केले.
No comments