Breaking News

ऊसतोड मजुरांसाठी आ.सुरेश धसांची महाराष्ट्र भर परीक्रमा !


धसांचे नेतृत्व कौशल्य महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर झाले अधोरेखित 

पक्षालाही ग्रामीण भागात होणार फायदा 

के. के. निकाळजे । आष्टी 

ऊस तोड मजुर,मुकादम व वहातुकदार यांच्या हक्काच्या दरवाढीचा मुद्दा हाती घेत आ. सुरेश धस यांनी महाराष्ट्रातील ज्या तालुक्यातुन ऊसतोड मजुर,मुकादम व वहातुकदार हे साखर कारखान्यावर जातात त्यांनी दरवाढ व ईतर मागण्या मंजुर होईपर्यंत कोयता म्यान ठेवावा अशी साद घालत दिनांक २४/९/२०२० ते दिनांक ५/१०/२०२० या अकरा दिवसात सोळा जिल्ह्यातील पस्तीस तालुक्याचा  राज्यव्यापी दौरा केला,आ.धस यांच्या या ऊसताेड मजुरांसाठीच्या परीक्रमेतुन धसांच्या नेतृत्व कौशल्याची राज्यात झलक दिसत असुन या निमीत्ताने त्यांनी राज्याच्या राजकीय पटलावरील आपले स्थान स्पष्टपणे अधोरेखित केल्याचे चित्र आहे. धसांनी ऊसतोड मजुरांना संघटित करून बांधलेल्या वज्रमुठीचा भाजपाला येणाऱ्या कळात मोठा फायदा तर मिळणार असल्याचे चित्र आहे.

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यातील ऊसतोड़ कामगारांना संघटित करण्यासाठी संपुर्ण राज्यात फिरून त्यांची वज्रमुठ बांधली होती, राज्यातील तमाम ऊसतोड मजुरांनी त्यांचे नेतृत्व सर्वमान्य करून त्यांच्या पाठीशी आपली संपुर्ण ताकद उभी केली होती त्यामुळे पुढे भाजपाला देखील प्रचंड फायदा झाला होता व ऊसतोड़ कामगारांच्या पट्टयात बहुतांश ठिकाणी कमळ फुलले होते, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्यावर सर्व जबाबदारी आली , ऊसतोड़ मजुर मुकादमांच्या संघटनांनी त्यांचेही नेतृत्व स्वीकारत त्यांना लवादा वर पाठवले.मागील काही काळापासुन सर्वत्र कोरोनाचे महासंकट फैलावले व शेतकरी, ऊसतोड़णी कामगार व सर्वसामान्याच्या प्रशनाकडे राजकीय पक्ष् व नेत्यांचे आपसुकच दुर्लक्ष झाले, अशा परीस्थितीत आ.सुरेश धस यांनी मात्र नेहमीप्रमाणेच अचुक टायमिंग साधला व संकटकाळातही स्वतः रसत्यावर उतरून वेगवेगळी आंदोलने करून आपल्या सक्रीय नेतृत्व कौशल्याचा सर्वानाच परीचय दिला.

सुरुवातीला लॉकडावुन झाल्यानंतर विविध ठिकाणच्या कारखान्यांवर अडकलेले ऊसतोड़ मजुर आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले त्यावेळी भिगवण जवळ या मजुरांच्या जथ्याला पोलीसांनी अडवले त्या वेळी धस हे ऊसतोड कामगारांसाठी अक्ष्ररशः मध्यरात्री दिड वाजता त्या ठिकाणी दाखल झाले होते व या मजुरांना अडवणाऱ्या पोलीसांना जाब विचारला होता, या साठी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता, त्या वेळे पासुनच आ. धस यांनी ऊसतोडकामगारांचा प्रश्न खऱ्या अर्थाने हाती घेतला होता.

सध्या कोरोनाचा संकटकाळ असुन अशा कठीण परीस्थितीत आ.धस हे ऊसतोड़ कामगारांसाठी मैदानात उतरले आहेत,महाराष्ट्रातील नवु ऊसतोड मजुर,मुकादम व वाहतुकदार या संघटनांनी आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला पाठींबा दिल्यामुळे त्यांनी थेट राज्याचा दौरा सुरू करून या संदर्मात त्या त्या ठिकानचे ऊसतोड मजुर कामगार, यांच्याशी चर्चसत्र सुरू केले त्यांनी आत्तापर्यंत नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, परभणी ,जालना, अहमदमगर, सोलापुर कोल्हापुर, सांगली ,यवतमाळ अशा सोळा जिल्ह्यातील पस्तीस तालुक्याचा मॅरेथॉन दौरा केला व या दौऱ्याला भाजप नेतृत्वाचीही अधिकृत मान्यता असल्याने प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकानचे लोकप्रतिनिधी व कार्येकर्तेही या मध्ये सक्रीय सहभागी झाले .

मुंडे कुटुंबाला माननारा वर्ग  !

आ.सुरेश धस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच हे आंदोलन सुरु असुन त्यांचाच शब्द अंतिम राहील व कारखान्याने करार करण्यासाठीगोपीनाथ गडावर यावे असे सुरूवातीलाच जाहीर केले होते  बहुतांश ऊसतोड़ मजुरांचा पट्टा हा मुंडे कुटुंबाला माननारा आहे. आ. धस यांच्या दौऱ्याला प्रत्येक ठिकाणीच उत्तम प्रतिसाद मिळात्याने धस यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी पंकजा मुंडे व धस यांच्यात बेबनाव होत असल्याच्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपा नेत्या पंकजा मुंडे व आ. सुरेश धस यांनी अगदी स्पष्टपणे याकडे दुर्लक्ष केल्याने बेबनावाच्या चर्चा  या निरर्थक असल्याचे स्पष्ट झाले आहे.


No comments