Breaking News

पंकजाताई मुंडे यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या - ऍड. निकाळजे

तर मग मुख्यमंत्री यांनी देखील स्वतःवर गुन्हे दाखल करून घ्यावेतभाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. वाल्मिक निकाळजे यांची  मागणी 

आष्टी  : भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय सचिव, राज्याच्या माजी मंत्री, राज्याच्या बहुजन नेत्या संघर्ष कन्या मा.पंकजाताई मुंडे यांनी दि.25 ऑक्टोबर रोजी सावरगाव ता.पाटोदा जि.बीड येथील "भगवान भक्ती गड" येथे "ऑन लाईन दसरा मेळावा" घेतला.त्यात भगवान भक्ती गडाच्या गाभाऱ्यात कोविड च्या कायद्याचे तंतोतंत पालन करणाऱ्या पंकजाताई मुंडे व 50 भगवान भक्त कार्यकर्ते यांच्या विरुद्ध  महाराष्ट्र शासन, पोलीस खाते व प्रशासन यांनी राजकीय हेतूने व आकसाने कोविड सोशल डिस्टंसिन्ग चा भंग केल्याबद्दलचा खोटा गुन्हे  दाखल केले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.जर पंकजाताई व त्यांच्या सोबतच्या 50 भक्त कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा सावरगाव च्या भगवान भक्ती गडाच्या गाभाऱ्यात भंग केला असे ठाकरे सरकार च्या शासन प्रशासनाचा आरोप असेल तर खुद्द मुख्यमंत्री उद्वव ठाकरे  यांनी देखील "स्वा. सावरकर हॉल, दादर, मुंबई येथे गर्दी जमवून कोविड सोशल डिस्टन्सिंग चा भंग केला नाही काय? पंकजाताई मुंडे यांच्या ऑन लाईन मेळाव्याने सोशल डिस्टन्सिंगचा भंग झाला तर मग मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या त्याच प्रकारच्या ऑन लाईन मेळाव्याने सोशल डिस्टन्सिंगचा भंग कसा काय झाला नाही. मुख्यमंत्री यांनीही तत्सम कार्यक्रम घेऊन भंगच केला आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देखील स्वतःविरुद्ध त्याच प्रकारचे गुन्हे दाखल करून घ्यावेत. नसता भाजपा अनुसूचित जाती मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करील असा इशारा व आग्रही मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष व राज्याचे जेष्ठ मानवी हक्क कार्यकर्ते ऍड.वाल्मिक  निकाळजे यांनी तहसीलदार नीलिमा थेऊरकर यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

  

निवेदनात  म्हटले आहे की,  सत्ताधारी मंत्री व विरोधी पक्षाचे नेते यांना वेग वेगळा न्याय का? पंकजा ताई मुंडे यांनी व उद्धव ठाकरे यांनी सारखाच कार्यक्रम घेतला असताना पंकजाताई मुंडे यांचे विरुद्ध सोशल डिस्टन्सिंग च्या नियमांचा भंग केला म्हणून गुन्हे दाखल होतात पण मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांचे तशाच प्रकारच्या कार्यक्रमा बद्दल मुख्यमंत्री यांचेवर तसाच गुन्हा का दाखल नाही? बहुजन महिला असा सवाल ऍड. निकाळजे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांना निवेदनाद्वारे केला आहे.

राज्याच्या ऊसतोड कामगारांच्या, मजूर, गोर गरीब, वंचित, शोषित,आदिवासी, भटके विमुक्त ओबीसी समाजाच्या बहुजन नेत्या, संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे व 50 भगवान भक्त कार्यकर्ते यांचे विरुद्ध राजकीय हेतूने व आकसाने दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत नसता भाजपा अनुसूचित जाती मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे उपस्थित व सहभागी होते. No comments