केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन
नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलगा चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली.
'बाबा... तुम्ही या जगात नाहीत पण मला माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात' असे ट्विट चिराग पासवान यांनी केले.
No comments