Breaking News

हाथरस अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या :- सुहास पगारे


भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या वतीने आष्टी तहसीलदार यांना निवेदन
 

आष्टी  : हाथरस येथील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे आष्टी तालुका अध्यक्ष सुहास पगारे यांनी आष्टी येथील तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

    

उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे 19 वर्षीय मागासवर्गीय दलित तरुणीवर बलात्कार करणाऱ्या चार नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी हाथरस येथील मागासवर्गीय तरुणीवर बलात्कार करून तिची जीभ कापली, गळा दाबून हत्या केली तसेच कुठल्याही नातेवाईकांना व आई-वडिलांना कल्पना न देता एका शेतामध्ये रात्रीचे अडीच वाजता शेतात नेऊन तिचा मृतदेह जाळण्यात आला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशी देन्यात यावी. अशी मागणी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली. या निवेदनावर भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे आष्टी तालुका अध्यक्ष सुहास पगारे, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे आष्टी तालुका युवक अध्यक्ष शुभम शिंदे, सचिन गायकवाड, , बुद्धभूषण पवार, गौरव निकाळजे, विरेन्द्र् निकाळजे, आदी च्या सह्या आहेत.


No comments