Breaking News

कोळी बांधवांच्या समस्या सोडविण्यास कट्टीबद्द आहे- अॅड.अमोल डोंगरे


माजलगाव : 
महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त माजलगाव शहरातील  छञपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रीय कोळी संघाचे वतीने  जयंतीचे  आयोजन करण्य आले होते.

  

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बहुजन समाज पार्टी बीड जिल्हा अध्यक्ष  अॅड. अमोल डोंगरे यांच्या उपस्थितीत महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.

      

यावेळी बोलतांना अॅड.अमोल डोंगरे म्हणाले की, बीड जिल्ह्यामध्ये कोळी महादेव ही जात संख्येने कमी असुन अल्पसंख्याक असल्याने हा समाज  शिक्षणापासुन कोसो - मैल दुर आहे व त्यांचे शैक्षणिक प्रमाण अत्यल्प असल्याने प्रगती खुंटली आहे. आणि जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी १९५० पुर्वीचे पुरावे उपलब्ध होत नसल्याने जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही व त्यामुळे तरूण शिष्यवृत्ती पासुन वंचित राहिल्याने  उच्चशिक्षण घेवु शकत नाही. तसेच पिढीजात धंदे आधुनिकीकरण झाल्याने बंद पडल्यामुळे समाजात बेरोजगारी वाढली आहे. तरी या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींनी आजतागायत दुर्लक्ष केलेले आहे. तरी आज महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छञपती शिवाजी महाराज चौकातून कोळी बांधवांना आश्वासन देतो की, यानंतर ची लढाई बहुजन समाज पार्टी जिल्हा  बीडचे वतीने सातत्यपूर्ण कायदेशीर व रस्त्यावर उतरून  न्याय मिळे पर्यंत सोबत राहुन लढू असे आश्वासन बहुजन समाज पार्टी बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. अमोल डोंगरे दिले. यावेळी कोळी राष्ट्र संघ ता.अध्यक्ष लहु सुरवसे, शहराध्यक्ष कृष्णा शिंदे, तालुका कार्याध्यक्ष लहु सांरंगे, राजेश कोंबडे, राहुल वाले,अर्जून मंदे, आकाश आवसे, अक्षय कडतन सह कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments