Breaking News

श्री सिध्देश्वर प्रा.विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक मनोहर नरसिंगे सरांचा सेवागौरव कार्यक्रम संपन्न

 


माजलगाव:  श्री सिध्देश्वर प्राथमिक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक मनोहर पंडितराव नरसिंगे हे दि.31 आॅक्टोबर रोजी शासकिय नियमाने सेवा निवृत्त झाले त्या निमित्त संस्थेच्या वतिने त्यांचा सेवागौरवाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन श्री सिध्देश्वर संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड,विशेष उपस्थित भा.शि.प्र.संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया भाऊ,सिध्देश्वर संकुलाचे कार्यवाह अमरनाथ खुर्पे,शालेय समितीचे अध्यक्ष अॅड.विश्वास जोशी,प्रेमकिशोर मानधने,जगदिश साखरे,तेजश महाजन,मुख्याध्यापक अंबादास रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

       

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमा पुजनाने झाली प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अंबादास रोकडे यांनी केले त्यात त्यांनी मनोहर नरसिंगे सराच्या सेवा कार्यातील अठवणीना उजाळा दिला.संस्थेच्या वतिने नरसिंगे सरांचा यथोचित सम्मान करण्यात आला यात सपत्निक आहेर सन्मान चिन्ह व भेट वस्तु देण्यात आली.

       

यावेळी बोलताना शालेय समितीचे अध्यक्ष विश्वास जोशी म्हणाले की,नरसिंगे सरांनी सुरुवातीच्या काळात विद्यार्थी घडवले तर पुढे चालत त्यांनी त्यांच्या आदर्श व्यक्तमत्वातुन शिक्षक देखील घडवले. सिध्देश्वर संकुलाचे कार्यवाह अमरनाथ खुर्पे यांनी नरसिंगे सरांच्या सेवेचा गौरव करताना सांगितले की,जेष्ठ शिक्षकांनी आपली संस्था व शाळा यशोशिखरावर नेली आहे तीच जबाबदारी आता तरुण शिक्षकांनी पार पाडायची आहे.कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया भाऊ म्हणाले की,संस्काराचा वसा घेऊन चालणारी संस्था घडत जात इतरांना घडवत जाते.

   

सत्कारमूर्ती मनोहर नरसिंगे हे आपले मनोगत व्यक्त करत असताना अतिशय भावुक झाले ते म्हणाले की,मी तरुण पणा पासुन संघ विचाराने प्रभावित होउन कार्य करत होतो.शाळेत नौकरी लागलो तेव्हा माझ कार्य चालुच होते या काळात मला भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या सह अनेक थोर व्यक्तीचा सहवास लाभला अध्यक्षीय समारोप करताना सिध्देश्वर संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड म्हणाले की,जेष्ठ शिक्षकांची होणारी पोकळी नविन शिक्षकांनी भरुन काढावी.

       

या गौरव समारंभास नरसिंगे सरांचे जुने  सहकारी बळीराम सोळंके सर.बबन कानडे सर,तिडके सर कुटूंबातील सर्व सदस्याची उपस्थिती होती.यावेळी शाळेतील विद्या गवते,प्रकाश असनारे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सुञसंचलन रतन गिरी यांनी केले तर श्रीमती संगिता ठोंबरे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments