Breaking News

शिरूरमध्ये भाजपाचे महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेध आंदोलन

 

शिरूर कासार : शेतकरी हिताच्या असलेल्या कायद्याला महाराष्ट्र सरकारने स्थगिती आदेश दिल्यानं सरकारचा बीड जिल्ह्यात भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. शिरूर कासारमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष मधुसूदन खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयसमोर निदर्शनं करून शेतकरी विधयेकाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यात यावी. अशी मागणी तहसीलदार श्रीराम बेंडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कृषी विषयक ऐतिहासिक विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करुन शेतक-यांच्या जीवनातील अमुलाग्र बदल घडवणारे क्रांतीकारक पाऊल उचलले आहे.  परंतु महाराष्ट्र राज्यातील महाभकास आघाडी सरकारने केंद्रसरकारच्या कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती आदेश दिलेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये असंतोषाचे वातावरण  निर्माण झाले आहे. 

 महाराष्ट्रात शेतकरी हिताचा हा कायदा लागू केला नाही हा कायदा त्वरित लागू करावा. या प्रमुख मागणीसाठी  भारतीय जनता पार्टी शिरुर कासारच्या वतीने  तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर, भाजयुमो तालुका सरचिटणीस कालिदास आघाव,  दत्ता भुजबळ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी- कार्यकर्ते शेतकरी सहभागी झाले होते. 


No comments