Breaking News

स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या मागण्या प्राधान्याने मान्य कराव्यात - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले


 

          मुंबई : स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांच्या आणि वारसदारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून पुढील एक महिन्यात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

          


विधानभवन येथे राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि त्यांच्या पाल्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री श्री दत्तात्रय भरणेस्वातंत्र्य सैनिक कक्षाच्या प्रधान सचिव वल्सा नायरउपसचिव राहुल कुलकर्णीकरपतेवित्त विभागाचे उपसचिव सु.मो. महाडिकस्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघटनेचे भाऊसाहेब साळुंखेआप्पासाहेब शिंदे उपस्थित होते.


          विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणालेस्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा, स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा सन्मान झालाच पाहिजे. या दृष्टीने त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी इतर राज्यांप्रमाणे समांतर आरक्षण तसेचज्याप्रमाणे अनुकंपा तत्त्वावर नोकर भरती केली जाते त्याप्रमाणे त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठीची प्रक्रिया राबविण्यासाठी तातडीने कारवाई करावी. याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटूंबाकडे दुर्लक्ष न करता स्वातंत्र्य सैनिक हयात नसल्यास कुटूंबातील किमान एका व्यक्तीस शासकीय नोकरीचा लाभ देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी.


          त्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करणेघरकुल योजनेत विशेष बाब म्हणून सामावून घेणे आणि स्वातंत्र्य सैनिकासह त्यांच्या वारसदारास ओळखपत्र देण्यासंदर्भात  सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
No comments