Breaking News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी कृषी कार्यालयाकडे संपर्क करावा - -आ. बाळासाहेब आजबे

के. के. निकाळजे । आष्टीआष्टी पाटोदा व शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसा पासून पडलेल्या सततच्या पावसामुळे कांदा कापूस सोयाबीन तूर यासह आदी पिकांचे काही भागांमध्ये नुकसान झाले आहे  अशा शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा उतरला असेल तर पिक विमा मिळण्यासाठी कृषी कार्यालयातील संपर्क साधून विमा कंपनीच्या पोर्टलवर त्याची नोंद करावी असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे.

         आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला आहे व त्यांचे सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी कार्यालयात संपर्क साधून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विमा कंपनीच्या प्रतिनिधी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून आपल्या नुकसानीची माहिती देऊन पंचनामे करून घ्यावेत नुकसान होऊनही जे शेतकरी विमा कंपनीच्या पोर्टलवर माहिती भरणार नाहीत अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही त्यामुळे पिक विमा भरलेल्या व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ याची नोंद कृषी कार्यालकडे करावी म्हणजे झालेल्या नुकसानीचे विमा मिळण्यास मदत होईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी ज्येष्ठ नेते काकासाहेब शिंदे उपस्थित होते.

 ज्या शेतकऱ्यांचे जास्त पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे व त्यांनी पिक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा पोर्टल वर आपल्या नुकसानीची माहिती नोंद  करावी लागणार आहे तरच पिक विमा मिळण्यास मदत होईल, त्यामुळे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनीआपल्या नुकसानीची नोंद करावी, पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात उपलब्ध आहेत. असे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर म्हणाले. No comments