Breaking News

उसतोड मजुराच्या मृत्यू प्रकरणी कारखानदार आणि वाहतूक ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा- आमदार धस


के. के. निकाळजे । आष्टी 

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर उसतोडणीसाठी नेलेल्या मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे गाळपाचा परवाना अद्याप मिळाला नसूनही मजुराच्या जीवाशी खेळणारे साखर सम्राट कारखानदार आणि मजुरांना दमदाटीकरून गरिबांचा गैरफायदा घेणाऱ्या वाहतूक ठेकेदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली आहे.

 

मयत ऊसतोडणी मजूर मनोहर नवल पाटील यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देताना ते बोलत होते ते म्हणाले, दि. १४ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री नऊ वाजता टेंभुर्णी परिसरातील परिते ता. माढा या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील मजूर मनोहर नवल पाटील मजुराचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला त्याचे मृतदेह तीन दिवसांनी त्याच परिसरात सापडला त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

वास्तविक पाहता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला गाळप परवाना मिळाला नाही तरी ही मजुरांना वाहतूक ठेकेदार मुकादम यांनी मजुराच्या गरिबीचा फायदा घेऊन ट्रक टेम्पोमध्ये शेळ्या, मेंढ्यांच्या कोंबून ठेवले आहे जनावरपेक्षा हि त्याची अवस्था वाईट झालेली आहे.अंधाऱ्या जागी भर पावसात मजुरांना ठेवल्यामुळे मजुराना ठेवल्यामुळे मनोहरला जीव गमवावा लागला आहे. त्याची पत्नी आणि दोन मुले यांना आम्ही आर्थिक मदत म्हणून ५१ हजार रुपये देत आहोत.

गेल्या शंभर वर्षातला सर्वात जादा पाऊस यावर्षी माढा परिसरात झाला आहे. ऊस तोडणी तसेच गळीत हंगाम अद्याप सुरू होण्यापूर्वी मजुरांच्या जीवाशी खेळ चालू आहे. या ऊसतोडणी मजुरांचा गावापासून जाताना ते परत गावी आणून सोडणे पर्यंतचा विमा उतरवलेला असतो आणि मनोहर पाटील यांचा विमा उतरवलेला नसेल तर कारखानदार आणि ट्रक वाहतूक ठेकेदार यांचे विरुद्ध नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहोत सध्या "कोयता बंद" आंदोलनामुळे आणि अद्यापही दरवाढीचा करार झाला नसल्यामुळे मजूर कारखानाकडे गेलेले नाहीत परंतु धनदांडगे कारखानदार, ठेकेदारांचे मुकदमाचे मदतीने दडपशाही करून मजुरांना त्याप्रमाणे घेऊन जात आहेत.

त्यामुळे मयत मनोहर पाटील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कारखानदार आणि ट्रक वाहतूकदार ठेकेदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी गोपीनाथराव मुंडे साहेब ऊसतोड मजूर संघटना,श्रमिक उसतोड मजूर संघटना आणि आपली मागणी आहे असे शेवटी आ. धस म्हणाले.

आ.धसांमध्ये मुंडेसाहेबांचा चेहरा दिसतो 

गोरगरीब, दिनदुबळ्यांसहीत जसा जिव्हाळा ऊसतोड मजुरांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या बाबता गोपीनाथजी मुंडे साहेबांना होता.त्यानंतर त्यांच्या इतकीच तळमळ आणि धडपड आम्हाला आ.सुरेश धस यांच्यामध्ये दिसून आली.जणू आ.धसांमध्येच आम्हाला आता मुंडेसाहेबांचा चेहरा दिसतो अशी प्रतिक्रिया कापडणे, जि. धुळे येथील बाटु आबा पाटील यांनी दिली.


No comments