Breaking News

भोजगाव येथील संत कुटुंबीयांचे अमरसिंह पंडित यांनी केले सांत्वन


मोटरसायकल प्रवास करून घेतली भेट

गेवराई :  भोजगाव जोड रस्त्यावरील अमृता नदीवरील पूल वाहून गेल्याने नदीपात्रात महादेव शेषेराव संत ( वय ४० वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान तालुक्यातील जनतेच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी असणाऱ्या माजी आमदार अमरसिंह पंडित दि. ४ ऑक्टोबर रोजी संत कुटुंबायांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अमृता नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे रस्ता नसतांनाही अमरसिंह पंडित यांनी पायी आणि दुचाकीवर प्रवास करून भोजगाव येथील संत कुटुंबाची भेट घेतली व कुटुंबियांना धीर देऊन सांत्वन केले. 
 

भोजगाव येथील महादेव संत हे दि. २  ऑक्टोबर रोजी आपल्या गावी भोजगाव येथे जात असताना अमृता नदीवरील खचलेल्या पुलावरून वाहत्या पाण्यात वाहून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळतात माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी संत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. भोजगाव येथे येण्यासाठी अमृता नदीच्या पुलावरून यावे लागते पण पूल खचल्यामुळे रस्ता बंद पडला होता. अशाही परिस्थितीमध्ये पायी चालत आणि मोटारसायकल वर प्रवास करून अमरसिंह पंडित यांनी भोजगाव येथे जाऊन संत परिवाराची भेट घेतली. रस्ता आणि पुलाची झालेली दुरावस्था अतीशय गंभीर असून हा प्रश्न सोडविण्यासाठी आणि संत परिवाराला शासन स्तरावरुन आर्थिक मदत करुन देण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, जयदीप औटी, दत्ता संत, प्रल्हाद शिंदे, शैलेश संत, दिनकर संत, नंदू संत, विक्रम संत आदी उपस्थित होते.


No comments