Breaking News

अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी प्राचार्या डॉ रेखाताई परळीकर यांची निवडपरळी वैजनाथ : अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेची बीड जिल्हा महिला आघाडी  नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी प्राचार्या डॉ. रेखाताई परळीकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष दिलीप चव्हाण व जिल्हाध्यक्ष महादेव लोमटे यांनी नुकतीच केली आहे. याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

                

अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप चव्हाण व जिल्हाध्यक्ष महादेव लोमटे यांनी नुकतीच एका आँनलाईन बैठकीच्या माध्यमातून महिला आघाडीची नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखाताई परळीकर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. रेखाताई परळीकर या सतत सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असतात. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात २००३ पासून प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत. १७ वर्षे प्राचार्या म्हणून यशस्वी कारकिर्द आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी याबदल दिल्ली येथील संस्थेने राष्ट्रीय पुरस्कार देवून त्यांचा गौरवकेलेला आहे. तसेच परळी भुषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर अनेक वर्षे कार्य केलेले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेने त्यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


No comments