Breaking News

आमरण उपोषण: दोन्ही क्षीरसागर एकच ! एमआयएमचा शिवसंग्रामच्या आंदोलनास पाठिंबा - अमर शेखबीड : गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणास नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. दोन्ही क्षीरसागर कुटुंब एकच असून मुख्याधिकारी यांची देखील त्यांना साथ असल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक अमर शेख यांनी उपोषणस्थळी शिवसंग्रामच्या आंदोलनास पाठिंबा देताना प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

  ते पुढे बोलताना म्हणाले कि, काहीतरी मिळवण्याच्या स्वार्थापायी क्षीरसागर कुटुंब सत्तेचा दुरुपयोग करून बीडकरांना त्रास देत आहे. प्रशासनाला हाताशी धरून अन खोटी नाटके करून एकच असताना वाद दाखवला जातो व आपला स्वार्थ क्षीरसागरांकडून साधला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. माझा व एमआयएम बीड शहरचा या उपोषणास पाठिंबा असून प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा या आंदोलनाचा भडका अख्ख्या शहरातून होऊन शहरवाशियांचा संताप बाहेर पडेल असे ते यावेळी प्रसारमाध्यांशी बोलताना म्हणाले.  

    No comments