Breaking News

राष्ट्रवादीचा माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रम परळीत फेल

नगरसेवक व कार्यकर्ते माझं काम माझी गुत्तेदारीतच व्यस्त

परळी  : मोठा  गाजावाजा करून मुंबईत अर्थमंत्री जयंत पाटील आणि खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते माहिती पञिकेचे प्रकाशन केलेला परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम सपशेल फेल झाला आहे. परळीत नगरसेवक सोडा साधा कार्यकर्ता कुणाच्या दारी फिरकला नाही. 

    

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू केले होते. आणि यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरोघर जाउन जनजागृती करावी असे आवाहन केले होते. 

    परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी यांनी याविषयी रंगीत माहिती पञक काढले. या माहिती पञकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अर्थमंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, आमदार संजय दौंड यांचे फोटो व कोविड 19 परळीत कसा वाढत आहे आणि जनतेने काय करावे. हे प्रसिद्ध केले. याच  विषयावर हालगे गार्डन येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करून ना. धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांनी हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. 

     या  बरोबरच परळी शहरातील सर्व प्रभागांमध्ये आरोग्य पथकासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवून गृहभेट द्यावी आणि त्यास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.  दरम्यान माझं काम माझी गुत्तेदारी यात व्यस्त असलेल्या नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी या सरकारच्या महत्वाकांक्षी अभियानाचा डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे यामुळे माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा परळी शहर व तालुक्यात बोजवारा उडाला आहे.


No comments