Breaking News

आमदाराच्या निष्क्रियतेला कंटाळून भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेशमादळमोही जि. प. गट मध्ये भाजपला खिंडार

गेवराई :  कोरोना सारख्या महामारीने त्रस्त झालेली जनता, अतिवृष्टीमुळे नुकसानीत सापडलेला शेतकरी अशा गंभीर परिस्थितीमध्ये गेवराई मतदारसंघाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी  यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करुन त्यांना वा-यावर सोडले. आमदाराच्या या निष्क्रियतेला कंटाळून त्यांचे खंदे समर्थक आणि मादळमोही जि. प. गटातील भाजपाचे तत्कालीन उमेदवार बळीराम रसाळ, सावळेश्वरचे भाजपा समर्थक सुभाष केरुळकर, शिवसेनेचे मिरगाव येथील माजी सरपंच भाऊसाहेब माखले, इटकूर येथील बंडू परदेशी यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विजयसिंह पंडित यांच्या सोबत काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत केले. या जाहीर प्रवेशासाठी सरपंच ज्ञानेश्वर नवले यांनी विशेष परिश्रम घेतले असून यामुळे मादळमोही आणि परिसरातील भाजपाला खऱ्या अर्थाने खिंडार पडले आहे.
मादळमोही येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मादळमोही जि. प. गटातील भाजपाचे तत्कालीन उमेदवार  बळीराम रसाळ, सावळेश्वरचे भाजपा समर्थक सुभाष केरुळकर, शिवसेनेचे मिरगाव येथील माजी सरपंच भाऊसाहेब माखले, इटकूर येथील बंडू परदेशी यांच्यासह भागवत रसाळ, राजेश रसाळ, अंगत कार्ले यांनीही माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी माजी सभापती बबनराव मुळे, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दिपक भैय्या वांरगे, माजी सभापती पांडुरंग कोळेकर, जिल्हा बँकेचे संचालक कैलास नलावडे, पंचायत समितीचे सदस्य जयसिंग जाधव, दत्ता भोजगुडे, चिंतामण रोमन, खडकी सेवा संस्थेचे चेअरमन विकास सानप, सिरसमार्गचे माजी सरपंच सोमेश्वर गचांडे, पांडुरंग शिंदे, संदिपान दातखिळ, भाडंगवाडीचे सरपंच तथा निराधार समितीचे सदस्य  ज्ञानेश्वर नवले, सिंदखेडचे सरपंच ठोसर, अर्जुन बगाड, पत्रकार कारंडे यांचेसह मान्यवर उपस्थित होते. 
कोरोना सारखी महामारी आणि  अतिवृष्टीच्या संकटाला सामोरे जात असताना भाजप नेतृत्वाने संपूर्ण मतदारसंघ, जनता आणि जीवाभावाचे कार्यकर्त वाऱ्यावर सोडले, या संकटकाळी ते घराच्या बाहेर पडले नाहीत.  लोकांच्या सुख दु:खात सहभागी झाले नाहीत. मात्र या गंभीर प्रसंगात आणि संकटाच्या परिस्थितीत विधानसभेमध्ये झालेला पराभव बाजूला ठेवून माजी आमदार अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्याला आधार आणि दिलासा देण्याचे काम केले. मात्र भाजप नेतृत्वासाठी जिवाचे रान करणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विद्यमान आमदारांनी वाऱ्यावर सोडले,  ते सर्व कार्यकर्ते भाजप नेतृत्वाला कंटाळले असून येणाऱ्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान भाजपा नेतृत्वाला हिसका दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत आहेत. अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनेक भाजप कार्यकर्ते जाहीर प्रवेश करत आहेत. या पुढील काळातही संपूर्ण तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ओढा वाढणार असून आनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा तालुक्यात आहे.

No comments