Breaking News

समाज घडवण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची - गटशिक्षणाधिकारी राऊत


मसाप आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात 

परळी वैजनाथ : मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या व 5 सप्टेंबर रोजी घोषित झालेल्या 'आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 ' चे वितरण समारंभ बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5  वाजता बचपन प्ले स्कूल कावेरी प्लाझा रोड परळी वैजनाथ येथे उत्साहात संपन्न झाला . यावेळी 'समाज घडवण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते;अशा शिक्षकांचा मान सन्मान ही परिषद करते.परिषदेचा हा उपक्रम स्तुत्य आसल्यचे  मनोगत परळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.आर.एन. राऊत यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे मा .लक्ष्मण वाकडे , मा.श्याम आघाव या  मान्यवरांचीही समायोचित मनोगते झाली.पुरस्कारप्राप्त शिक्षकापैकी प्रातिनिधिक स्वरूपात बाबासाहेब मुंडे, पंजाबराव येडे, सुनिता कोमावार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.चंदुलाल बियाणी हे होते .तर जि.प.सदस्य लालासाहेब तिडके कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

परळी मसापच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक ,सामाजिक ,साहित्यिक तसेच  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला .याच कार्यक्रमात स्वर्गीय मोहनलाल बियाणी स्मृती सेवा गौरव पुरस्कार आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा साहित्य गौरव पुरस्कार 2020 याचेही वितरण करण्यात आले.यावर्षी एकुण १४ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परळी मसापचे 

कोषाध्यक्ष प्रा .संजय आघाव, उपाध्यक्ष अरुण पवार ,जेष्ठ साहित्यिक व मार्गदर्शक प्रा . मधू जामकर,आबासाहेब वाघमारे गुरुजी, भवानराव देशमुख , प्रा . प्रकाश कोपार्डे , प्रा . अर्चना चव्हाण , प्रा . सुलभा वाघमारे , विजया दहिवाळ , रंगनाथ मुंडे , सिद्धेश्वर इंगोले , नितीन ढाकणे , मुक्तविहारी ऊर्फ केशव कुकडे, प्रा .अरूण चव्हाण, प्रा .डॉ . नयनकुमार विशारद , प्रा .रा. ज . चाटे, लक्ष्मण लाड , बालाजी कांबळे, प्रा .डॉ. राजाभाऊ धायगुडे , प्रा .डॉ . बापू घोलप  , प्रा.चेतना गौरशेट्टे , अॅड . दत्तात्रय आंधळे , गणगोपलवाड गणपत ,डॉ .नेरकर , सुनिता कोमावार, किरण आटोळकर , योगेश पुल्ले ,प्रा.अमर आल्दे आदींनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसापचे सचिव प्रा.राजकुमार यल्लावाड, सूत्रसंचालन कवी अनंत मुंडे तर आभार प्रकटन पुरस्कार निवड समिती प्रमुख बंडू अघाव यांनी केले .

/span>


No comments