Breaking News

खळवट लिमगाव येथील ग्रामस्थांचे अर्धनग्न आंदोलन


जगदीश गोरे ।  वडवणी 

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे दि.२२ऑक्टोंबर रोजी देव नदीवर पूल नसल्याने पाण्यात बुडुन ३ व्यक्तींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता या मृत्युनंतर गावात प्रशासनावर संताप व्यक्त केला जात होता. सर्व गावकऱ्यांनी आज वडवणी येथे तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन येथे अर्धनग्न आंदोलन केले.

हे आंदोलन आण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी महाराज चौक, आंबेडकर चौक , वसंतराव नाईक चौक ते बाजार समिती मार्गे करण्यात आले.वडवणी येथिल तहसील व पोलीस स्टेशन येथे जाऊन पीडित कुटुंबाला प्रत्येकी २० लक्ष रुपये आर्थिक मदत द्यावी व पुलाचे काम आठ दिवसात सुरू करून पुढील दुर्घटना टाळावी अशी मागणी केली.प्रशासन एवढं ढिम्म आहे की निवेदन स्वीकारायला देखील जबाबदार अधिकारी हजर नव्हते.

आठ दिवसात मागण्या मान्य नाही झाल्या तर गावकरी यापेक्षाही उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.  पुढील संवेदनशील वातावरणात काही जीवित व वित्त हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

गावकऱ्यांनी पूर्ण वडवणी शहरात फिरून जनतेचे लक्ष वेधून घेतले, व व्यापाऱ्यांनी देखील संबंधित माहिती घेऊन  पुढील आंदोलनात सहभागी होणार असल्ल्याचे सांगितले. यावेळी शिवसेनेचे नेते विनायक मूळे व रिपाइंचे तालुका अध्यक्ष महादेव उजगरे यांनी या आंदोलनात सहभागी घेतला.


No comments