त्या नराधमांना फाशी द्या..!
जिल्हाकचेरी समोर रिपाइंचे निदर्शने
बीड : हाथरस येथील अत्याचार प्रकरणातील त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी करत रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलन मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील वाल्मिक समाजातील एका मुलीवर सामुहिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे. तसेच त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने निदर्शने करून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात किशन तांगडे, मझर खान, अविनाश जोगदंड, अमर विद्यागर, भाऊसाहेब दळवी, भेय्यासाहेब मस्के, नागेश शिंदे, विलास जोगदंड, महेश आठवले, बाबा देशमाने, सतिष शिनगारे, रामसिंग टाक, सुभाष तांगडे, सचिन वडमारे, नरसिंग पिव्हळ, अशोक दळवी, गणेश वाघमारे, के. के. कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
No comments