Breaking News

नम्रता आठवलें व राहुल बोराडेंचे आयआयटी परीक्षेत यश


तालूका भरातून होत आहें अभिनंदनाचा वर्षाव 

शिरूर, कासार : शहरातील पिग्मी एजंट तथा शालेय व्यवस्थापन समिती सदस्य बाळासाहेब बोराडे यांचे चिरंजीव राहुल बोराडे व  तालुक्यात ईमादारीने सेवा केलेले डॉ विकास आठवले यांची कन्या नम्रता हे दोघेही आयआयटी पात्र झाल्यामुळे शिरूरकासार तालुक्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरूरकासार तालुक्याला पंधरा वर्ष सेवा देणारे डॉ. विकास आठवले व नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बाळासाहेब बोराडे यांच्या पाल्याने आयआयटी पात्र परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या पालकांचेच नव्हे तर तालुक्याचे नावं उंचावले अश्या प्रतिक्रिया शिक्षण प्रेमातून येत आहेत.

डॉ. विकास आठवले हे ख-या अर्थाने हा मानुस म्हणजे देवदुत आहे. रायमोहा, शिरूरकासार खालापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून लाखों गोरगरीबांची सेवा केली.बढती मिळाल्याने त्यांना हा भाग सोडून जावा लागला. ज्या वेळेस गोरगरीब जनतेला कळाले तेव्हा.

अत्यंत वाईट वाटले. डॉ विकास आठवले म्हणजे तालुक्याचा खरा देवदुत त्यांच्याकडे प्रत्येक आजारी रूग्ण गेला तर ठणठणीत होत होता अशा या शिरूरकासार तालुक्याच्या लाडके असलेले डाँक्टर सध्या केज तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांची कन्या नम्रता ही आयआयटीत पात्र ठरल्यामुळे संपूर्ण शिरूरकासार तालुक्यात नम्रताचे कौतुक होत आहे. तसेच व्यवस्थापन कमिटीचे माजी अध्यक्ष श्री बाळासाहेब बोराडे यांचे चिरंजीव राहुल बोराडे यांनी IIT पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश मिळवले त्याबद्दल राहुलचे व पालकाचे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, व्यवस्थापन समिती सदस्य तसेच शिक्षक यांनी हार्दिक अभिनंदनकेले असून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments