Breaking News

व्यायामशाळा सुरु करणेसाठी मार्गदर्शक तत्वे जारी- जिल्हाधिकारी राहुल रेखावार


कंटेन्टमेन्ट झोन वगळता इतर क्षेत्रात व्यायामशाळा सुरु

बीड  :  जिल्हयातील कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा दिनांक 26 ऑक्टोबर 2020 पासून सुरु करणेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटीस अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी दिले आहेत.         

                                                                            

सर्व संबंधीत व्यायामशाळा यांनी मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबत तपासणी करणेचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रदान करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शासन यांचे आदेश दिनांक 23 ऑक्टोबर 2020 अन्वये कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा दिनांक 25 ऑक्टोबर 2020 पासून सुरु करणेसाठी परवानगी देणेत आलेली असून याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे कडील दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजीच्या आदेशान्वये कन्टेंमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करणेसाठी मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत.

वरील आदेशाचे पालन न करण्याऱ्या व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कमल 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियत्रंण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.

या कार्यालयाचे संदर्भीय आदेश क्रमांक 37 अन्वये बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144 (1)(3) अन्वये दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजीचे रात्री 12.00 वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
No comments