Breaking News

राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट व मराठवाडा साथीच्या वतीने दी ग्रेट टॅलेन्ट शो कार्यक्रमाचे आयोजन

परळी : राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट आणि दै.मराठवाडा साथीच्या वतीने प्रथमच दी ग्रेट टॅलेन्ट शो या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी वय अथवा शहर अशी कोणतीही मर्यादा नसून राज्यभरातील कोणतेही कलावंत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कलेचे प्रदर्शन करु शकतात. स्पर्धेसाठी बक्षीसे ठेवण्यात आली असून स्पर्धेसाठी प्रारंभी ऑडीशन होऊन अंतिम ग्रॅण्ड फिनाले 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

मागील 7-8 महिन्यांपासून चालू असलेल्या कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक हौशी कलावंत आपल्या कलेचे प्रदर्शन करु शकले नाहीत. या संपुर्ण कालावधीत कोणतेही कार्यक्रम झालेले नसल्याने दी ग्रेट टॅलेन्ट शो हा उपक्रम कलावंतासाठी उपयुक्त असे व्यासपीठ ठरणार आहे. याकरिता ऑडीशनच्या वेगवेगळ्या फेर्‍या होणार असून ऑडीशनमध्ये निवड झाल्यानंतर त्या कलाकारांची अंतिम फेरी होणार आहे. या स्पर्धेत 2 मिनिटात संगीत, नृत्य, मिमीक्री, कॉमेडी, रांगोळी, मेहंदी, सॅण्ड आर्ट अशी कोणतीही कला किंवा कला गुण स्पर्धकाला सादर करता येणार आहे.

ऑडीशनसाठी नाव नोंदणी दि. 28 ऑक्टोबर पर्यंत बचपन प्ले स्कुल, कावेरी प्लाझा जवळ येथे करता येणार आहे. सर्व ऑडीशन्स व स्पर्धा लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे होणार असून 1 नोव्हेंबर रोजी वय वर्ष 5, 2 नोव्हेंबर 11 ते 15 वर्ष, 3 नोव्हेंबर 16 ते 25, 4 नोव्हेंबर 26 ते 40 आणि 5 नोव्हेंबर रोजी वय 40 च्या पुढे असणार्‍या कलाकारांना ऑडीशन देता येईल.

दि.8 नोव्हेंबर रोजी सायं.4 वा. महाअंतिम फेरी होणार असून 9 नोव्हेंबर रोजी सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी धिरज बाहेती, वैभव अग्रवाल, ज्ञानेश्वर गुट्टे, ज्योती शर्मा, वैजनाथ कासार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट व दै.मराठवाडा साथीच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments