शिरूर हवेलीच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करा - आमदार पवार
जिल्हा वार्षिक योजना साकव कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार अशोक पवार यांनी केली मागणी
सुनिल ज्ञानदेव भोसले । शिरूर ह.
शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापु पवार यांनी विविध भागात रस्त्यांची पाहणी केली.या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे रस्त्यांची खराब झाले व पुल बांधण्याची आवश्यकता आहे, रस्ते विकास हा सामाजिक विकासाचा एक पैलू आहे.
शिरूर हवेली मतदार संघात रस्ते खराब झाले असुन,पुलांची बांधण्याची हि आवश्यकता असल्याने जिल्हा वार्षिक योजना साकव कार्यक्रमांतर्गत विविध गावांच्या रस्त्यांवर पुल बांधण्यासाठी निधीची मागणी जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांना मागणी केलेली आहे.
या कामांचा आहे, समावेश
१) न्हावी सांडस भरतवाडी रस्ता (बोल्हाईवाट) येथे साकव बांधणे एकुण खर्च ३५ लक्ष रु
२)आळंदी म्हातोबाची येथील पानमळा ते रामवाडीओढ्यांवर पुल बांधणे एकुण खर्च ३५ लक्ष.
३) खामगाव टेक गावठाण ते शिवराम थोरात वस्ती नाल्यांवर पुल बांधणे एकुण खर्च ३५ लक्ष
४) जगताप वस्ती ते तरडे रस्त्यावर पुल बांधणे एकुण खर्च ३५ लक्ष रू. ५) पेरणे येथील पाटील वस्ती रस्त्यावरील ओढ्यांवर पुल बांधणे एकुण खर्च ३५ लक्ष रू.
६) लोणी काळभोर येथील रानमळा साठेवस्ती रस्त्यावरील ओढ्यांवर पुल बांधणे एकुण खर्च ३५ लक्ष.
७) टिळेकरवाडी ते बायफ रस्त्यावर(भटातील ओढा) पुल बांधणे एकुण खर्च ३५ लक्ष रु.
८) खामगाव टेक येथील धायगुडेवस्तीवरील रस्त्यावर खटकळी नाल्यावर पुल बांधणे एकुण खर्च ३५ लक्ष रु. ९)बी.पी.सी.एल कंपाउंड ते वरचे तरडे या रस्त्यावर पुल बांधणे एकुण खर्च.३५लक्ष रु.
१०) पेरणे येथील कदम वस्ती रस्त्यावरील ओढ्यावर पुल बांधणे एकुण खर्च. ३५ लक्ष रुपये या सर्व साकव कार्यक्रमांतर्गत विकास कामासाठी एकुण खर्च ३ कोटी ५० लाख रुपये असल्याचे शिरूर- हवेलीचे आमदार मा. अशोकबापु पवार म्हणाले.
No comments