Breaking News

वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करा!

 


फयाज कुरेशींचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बीड :   शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील तीन ते चार महिन्यापासून बंद असल्यामुळे बीड शहरात चोरीचे प्रकार वाढले आहे. तरी बशीरगंज परिसरात दि.24/10/2020 रोजी दोन दुकानावर चोरी झाली आहे, यापूर्वीही बीड शहरात असे अनेक प्रकार घडले असल्याने समाजसेवक फयाज कुरेशी यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सीसीटीव्ही सुरु करण्यासंबंधी निवेदन दिले आहे.

बीड शहरात एकूण 58 कॅमेरे लावण्यात आलेले असून त्यावर लाखोंचा खर्च झालेला आहे. 58 पैकी फक्त 5-6 सीसीटीव्ही कॅमेरे चालू असून बाकीचे बंद पडून आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालय व न.प.च्या मुख्याधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे 58 पैकी 53 कॅमेरे बंद पडलेले आहेत. तरी मा.जिल्हाधिकारी साहेबांनी स्वत: लक्ष घालून न.प.मुख्याधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालय यांना सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्याचे आदेश द्यावेत अशा मागणीचे निवेदन समाजसेवक फयाज कुरेशी, शेख मेहराज, फरमान पटेल, शेख रोहीब यांनी दिले आहे.


No comments