Breaking News

ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन प्रभाग पाच मधील नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवुन देवु- गोपाळ आंधळे


परळी : 
 प्रभाग क्र.पाच मध्ये  सर्व जाती धर्माचे गोरगरीब नागरीक असुन या नागरीकांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. सामजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या माध्यमातुन या योजनांचा लाभ पात्र नागरीकांना मिळवुन देवु अशी ग्वाही नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी दिली.  

  

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली व न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रभाग ५ मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश नगरसेवक गोपाळ आंधळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रभाग क्र.5 संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास लक्ष्मण वाघमारे, बळीराम नागरगोजे, हनुमान आगरकर, दिनेश आमले, अर्जुन साखरे, सचिन लगड, सचिन आरसुडे, रावसाहेब आंधळे, उत्तम आरसुळे, राजाभाऊ गित्ते, गोविंद कुकर,बालाजी काळे, शैलेश कदम, मुंजाजी तळेकर यांची उपस्थिती होती. यावेळी गोपाळ आंधळे यांनी नगरपालिका हद्दीतील नागरीकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.या पुर्वी प्रभाग पाच मधील शेकडो नागरीकांना अनेक योजनांचा लाभ मिळाला असुन येणार्या काळात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर योजनांचा लाभ मिळवुन देवु असे सांगीतले.


No comments