ऊसतोड कामगार गावगुंडाकडून कारखान्याकडे नेत आहेत ,भांडवलदारांचे कुटील कारस्थान उधळून लावा - सुखदेव सानप
आष्टी : साखर कारखानदार हे भांडवलदार असून शोषित, वंचित समाजाचे कामगारांना गावगुंडा कडून धमकावीत असून दहशतीच्या जोरावर गुंडांना कमिशन देऊन कामगारांना कारखान्याकडे बळजबरीने नेत असून कारखाना परिसरात कोंबड्याच्या खुराड्यात, कांदाचाळीत नेऊन ठेवत आहेत.
"कोयता बंद" आंदोलन उग्र होणार असल्याने हे भांडवलदार या दीनदुबळ्या मजुरांना आक दडपशाही करून लवकरात लवकर कारखान्याकडे घेऊन जात आहे. हे षडयंत्र आणि कुटील कारस्थान उधडुन लावून ऊसतोड मजुरांनी या दादागिरी विरुद्ध आवाज उठवावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे साहेब ऊसतोडणी मजूर, मुकादम आणि वाहतूकदार संघटनेचे सचिव सुखदेव सानप यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की,अनुसूचित जाती, जमाती,भटक्या,विमुक्त जाती जमाती मधील हे गोरगरीब मजूर यांना अत्यंत अशा आगाऊ रक्कम दिली जात आहे.महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यामुळे आणखी पाच नोव्हेंबर पर्यंत शेतात पाय ठेवता येणार नाही.तरीही मजुरांना का नेले जात आहे ? कारखानदार मजुरांच्या जीवनाशी,आरोग्याशी खेळ सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या कारखानदारांना गोरगरिबांची पर्वा नाही. गरीब मजुरांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात आहे. त्यामुळे मजुरांनी संपात भाग घेऊन आंदोलन यशस्वी करावे आणि यावर्षी भरघोस वाढ पदरात पाडून घ्यावी असे आवाहनही शेवटी पत्रकात करण्यात आले आहे.
No comments