Breaking News

शिवसंग्रामच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा


बीड शहर उद्धवस्त झालेले आहे, तात्काळ काम सुरु करा - ऍड राहुल वाईकर 

बीड :  'शिवसंग्रामचे माजी नगरसेवक दत्ता गायकवाड यांनी जे गेल्या ३ दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे त्याला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा आहे. शहर उध्वस्त करून भकास करणाऱ्या नगराध्यक्ष व नगरपरिषद प्रशासनाला आवाहन करतो कि आपण लवकरात लवकर जाणीवपूर्वक अडवलेल्या रस्त्यांची कामे तात्काळ सुरु करण्यासाठी निर्णय घ्यावा', असे म्हणत संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड राहुल वाईकर यांनी शिवसंग्रामच्या उपोषणास पाठिंबा देताना म्हंटले आहे. 

  

बीड शहरातील सुरु असलेले रस्ता काम जाणीवपूर्वक रखडवण्याचे काम क्षीरसागर बंधूंनी काही मिळवण्याच्या हेतूने केले आहे. हि कामे तात्काळ सुरु करावीत यासाठी हिरालाल चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला साक्षी मानून माजी नगरसेवक तथा शिवसंग्राम पेठ बीड विभागप्रमुख दत्ता गायकवाड हे उपोषणाला गेल्या ३ दिवसांपासून बसलेले आहेत. या उपोषणाला संपूर्ण बीडकरांसह विविध संघटना, पक्ष यांच्याकडून पाठिंबा मिळत असून काल एमआयएमसह संभाजी ब्रिगेडने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र अद्यापदेखील मग्रूर मुख्याधिकारी यांनी कसलीही कारवाई काम सुरु करण्यासाठी केलेली नाही.


No comments