Breaking News

वाहतूक नियंत्रकास सेवानिवृत्त सहाय्यक फौजदारानं बदाडल

दोघा विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल तर वाहतूक नियंत्रणकावर विनयभंग  गुन्हा दाखलगौतम बचुटे । केज

बसस्थानकाच्या जागेत एका खाजगी व्यक्तीने बांधलेल्या पायऱ्या काढण्या वरून एका धारूर आगाराच्या वाहतूक नियंत्रकास मारहाण केल्याप्रकरणी सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार ढोरमारे आणि त्यांच्या मुलाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबतची माहिती अशी की केज बसस्थानकातील पार्सल कार्यालयाच्या लगत बस स्टँडच्या आवारात बुधाची रामराव ढोरमारे यांचे घर असून त्यांनी घराच्या पायऱ्या या बस स्थानकाच्या जागेत बांधलेले आहेत. दिनांक १ ऑक्टोबर रोजी वाहतूक नियंत्रक सुरेश मस्के हे या परिसरात फिरत असताना त्यांना बस स्टँडच्या जागेमध्ये बुधाची ढोरमारे यांनी पायर्‍यांचे बांधकाम केले असल्याचे निदर्शनास आले. यामुळे वाहतूक नियंत्रक सुरेश मस्के यांनी ढोरमारे यांना पायऱ्या तुम्ही सरकारी पण जागेत बांधलेल्या पायर्‍या काढून घ्या. असे म्हणतात दुधाजी ढोरमारे व त्यांचा मुलगा वैभव ढोरमारे यांनी वाहतूक नियंत्रक सुरेश मस्के यांना मारहाण केली. याप्रकरणी मस्के यांनी दि. १ ऑक्टोबर रोजी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं. ५११/२०२० भा.द.व ३५३, ३३२, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे पोलीसांनी सहाय्यक फौजदार ढोरमारे यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करीत आहेत. 

दरम्यान वाहतूक नियंत्रक सुरेश मस्के यांनी एक महिला व तिचा पती हे बांधकामावर पाणी मारीत असताना तुम्ही सरकारी जागेत पायऱ्या बांधू नका असे म्हणून महिलेला ढकलुन देत विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे.  या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुरेश मस्के यांच्या विरुद्ध गु.र.नं. ४११/२०२० भा.दं.वि. ३५४, ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली रुक्मिण पाचपिंडे या करीत आहेत.No comments