Breaking News

युसूफ वडगाव महसूलच्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक

आठ महिने लोटले तरी विहिरींची नोंद घेण्यास टाळाटाळ !

गौतम बचुटे । केज : 

तालुक्यातील युदुफवडगाव येथील शेतकऱ्याच्या विहिरीची नोंद घेण्यास तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली असून आठ महिने झाले तरी विहिरींची नोंद घेण्यात आलेली नाही.

 युसुफवडगाव येथील शेतकरी प्रदीप दगडू राऊत यांनी युसुफवडगाव शिवारातील त्यांच्या मालकी हक्कांच्या जमिनीत सर्व्हे नं. २३१/३/२ मध्ये सन २०२० मध्ये सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत मध्ये विहीर जलसिंचन विहीर खोदली. त्या विहिरीला पाणी देखील लागले आहे. या संबंधी पंचायत समिती कार्यालयाने दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी महसुली अभिलेख्याला नोंद घेण्या संबंधी एक पत्र देखील दिले आहे. परंतु अद्याप पर्यंत त्याची तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी त्या विहिरींची महसुली अभिलेख्याल नोंद घेतली गेली नाही. 

दरम्यान या बाबत तलाठी यांच्याकडे रामेश्वर माणिक मुकादम यांनी सदर विहिरीची नोंद घेण्यात येऊ नये. म्हणून तक्रार अर्ज दिला असल्याने नोंद घेतली नाही. अशी तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाकडून माहिती मिळाली आहे.

आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातय ! 

 प्रदीप राऊत यांनी सर्व्हे नं. २८१/३/२ मध्ये विहीर खोदली आहे मात्र रामेश्वर मुकादम यांची तक्रार सर्व्हे नं. २८१/२/३ मधील आहे. या खोट्या व विसंगत तक्रारी वरून फेर रोखला जात आहे. म्हणचे आंधळं दळतय अन् कुत्र पीठ खातय ! अशी अवस्था आहे.

सुनावणीची गरज काय ?  

या प्रकरणी विहीरीचा फेर हा सुनावणी नंतर घेऊ असे कळते पण तक्रारच जर विसंगत असेल तर सुनावणीची गरज काय? केवळ शेतकऱ्यांना त्रास देणे किंवा चिरीमिरीसाठी तर नसावे ?No comments