Breaking News

'माझा व्यवसाय माझा हक्क' नोंदणी शिबिराचा ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा-तुकाराम आघाव

 

  


परळी वैजनाथ : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रम नोंदणी शिबिराचा शुभारंभ  राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते  करण्यात आलेला आहे. रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी  'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर उपयुक्त ठरणार आहे.  नोंदणी साठी अंतिम तारीख २५ आॅक्टोबर आहे.यामध्ये परळी मतदारसंघातील ग्रामीण भागातील अधिकाधिक बेरोजगारांनी नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तुकाराम आघाव यांनी केले आहे.

         

ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत   लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे नोंदणी शिबिर सुरू आहे. बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने 'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर घेण्यात येत आहे.कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या दृष्टिकोनातून आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे. परळी मतदार संघातील बेरोजगारांसाठी या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा असा प्रयत्न आहे. 

 या योजनेअंतर्गत विविध व्यवसायांसाठी वाहन,कर्ज उपलब्धी, सबसिडी, आवश्यक वाहने, साधनसामग्रीची व्यवस्था आदींबाबत सबसिडी बरोबरच कर्ज व आर्थिक हातभार लावण्यात येणार आहे. परळी मतदारसंघातील बेरोजगारांसाठी व स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी  आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी शिबिरात आपला व्यवसाय नोंदवावा. आहे.यामध्ये परळी मतदारसंघातील. ग्रामीण भागातील अधिकाधिक बेरोजगारांनी नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तुकाराम आघाव यांनी केले आहे.


No comments