Breaking News

छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा सातवा गळीत हंगामाचा शुभारंभ


के. के. आडागळे । माजलगाव 

 माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा सातवा गाळप हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर रविवारी 25 ऑक्टोबर रोजी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार बाजीरावभाऊ जगताप व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मोहनदादा जगताप, राहुल जगताप, तसेच संचालक जीवनराव जगताप, संतोषराव यादव ,विलास बडे, श्रीकृष्ण सोळंके, भगवानराव नरवटे, दिगंबर थावरे, पांडुरंग शिंदे, रावसाहेब गायकवाड, दिलीप घुबडे, एकनाथ डाके, हनुमंत बादाडे, दत्ता वाळसकर, शिवाजी सोजे, रमेश मोरे, भाऊसाहेब गोंडे, माणिक राठोड, गोविंद करवा तसेच बाजारसमीतीचे उप सभापती अच्युतराव लाटे, कार्यकारी संचालक महेश सगरे शेतकी अधिकारी सुरवसे, सचिव चंद्रकुमार शेंडगे, चीफ इंजिनिअर कणवळे, चीफ केमिस्ट थेटे तसेच कारखान्याचे कर्मचारी, बँकेचे कर्मचारी, कामगार, मुकादम, ऊसतोड मजूर, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

छत्रपती साखर कारखान्याने मागील सहा हंगामात शेतकऱ्यांचे हित जोपासत सर्वाधिक ऊसाला भाव देणारा कारखाना ठरला आहे. याही हंगामात सर्वाधिक ऊसाला भाव देण्याची परंपरा छत्रपती कारखाना कायम ठेवनार आहे. यावर्षीच्या हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला ऊस छत्रपती साखर कारखान्यास गाळपासाठी आणावा असे अवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन मोहनराव जगताप यांनी केले आहे.


No comments