Breaking News

जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाची टोलवा टोलवी.....!

बांधकाम विभाग अंतर्गत झालेल्या कामाची माहिती मागितली असता ग्रामपंचायतीला पत्र देऊन ठेवले कानावर हात !

गौतम बचुटे । केज   

तालुक्यातील एका ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकास कामांची माहिती जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडे मागणी केली असता त्यानी ग्रामपंचायती कडुन माहिती उपलब्ध करून घ्या. असे म्हणून टोलवाटोलवी करीत कानावर हात ठेवून माहिती नाकारण्याचा प्रयत्न केला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव ग्राम पंचायतीने आर्थिक वर्ष सन २०१८-१९ व २०१९-२० आणि सध्या सुरू असलेली विविध योजने अंतर्गत विकास कामे आणि त्यावर खर्च झालेला निधी; तसेच त्या अनुषंगाने इतर माहिती ही रिपाइंचे रवींद्र जोगदंड व गौतम बचुटे यांनी दि. २८/९/२०२० रोजी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग केज यांच्याकडे एका पत्राद्वारे मागितली होती. परंतु बांधकाम उपविभागाने त्यांना माहिती देणे तर दूरच ! मात्र  तब्बल एक महिना उलटल्या नंतर ग्रामसेवकांच्या नावे एक पत्र क्र. जा. क्र. बांउविके/जि प/२४४/२०२०, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग केज दि.१६/१०/२०२० हे पत्र देऊन देऊन अर्जदारास माहिती देणे बाबत कळविले आहे. त्याच बरोबर अर्जदारास पत्राची प्रत देऊन ग्रामपंचायतीकडून माहिती हस्तगत करण्या विषयी कळविले आहे. 

दरम्यान ग्राम पंचायततीला विकास कामासाठी दिलेला निधी, कामाचे अंदाज पत्रक, कार्यरंभ आदेश, मोजमापन पुस्तिका, गुण नियंत्रक अहवाल, काम पूर्ण झाल्याचा अहवाल आणि काम सुरू असताना व सुरू करताना कार्यरंभ आदेश ही सर्व माहिती बांधकाम विभागाकडे असते. त्यांचे शाखा अभियंता हे कामाचे रेखांकना सहित वेळोवेळी काम सुरू असताना भेटी देऊन मार्गदर्शन करीत असतात. एवढी सर्व माहिती बांधकाम उपविभागाकडे असताना केवळ माहिती न देण्याचा उद्देशाने त्यांनी हा पत्र प्रपंच चालविला आहे. या बाबत रवींद्र जोगदंड हे वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार असून वेळ पडल्यास उपोषणाला बसणार असल्याच मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.No comments