Breaking News

महादेव जाधव यांना सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती

  


केज :  हेडकॉन्स्टेबल महादेव जाधव यांना साहेब फौजदारपदी पदोन्नती मिळाली आहे. 


या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस स्टेशन येथे पूर्वी पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले महादेव जाधव यांना सेवांतर्गत सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती झाली आहे. सध्या ते अंबाजोगाई येथील ग्रामीण पोलीस स्टेशनला बदलून गेले असून त्यांच्या   पदोन्नती बद्दल केज, चिंचोली माळी साळेगाव, काळेगाव, हनुमंत पिंपरी आणि अंबाजोगाई परिसरातील त्यांचे सहकारी व नागरिक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


No comments