नवरात्री निमित्त आराधी महिलांना साडी वाटप : सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांचा उपक्रम
परळी : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभुमीवर संगम ता.परळीच्या सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांनी आराधी महिलांना साडी वाटपाचा उपक्रम घेतला आहे. आज एका कार्यक्रमात आराधी महिलांना साडी वाटप करण्यात आले.
नवरात्र उत्सव देशभरात साजरा केला जात असून देवीसमोर आराधी महिला भजन व गोंधळाचा कार्यक्रम दररोज सादर करीत असतात. या पार्श्वभूमीवर सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांनी 10 आराधी महिलांना आज खणा नारळाची ओटी भरत त्यांचा सन्मान केला.रा.कॉं.चे जेष्ठ नेते बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते 10 आराधी महिलांना साडी, चोळीचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी आई तुळजाभवानीची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रा.कॉं.चे जेष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, राधाकिशन साबळे, हर्षवर्धन देशमुख, राजाभाऊ गिराम, रावसाहेब नागरगोजे, प्रभाकर गिराम, सुरेश मोगरे सर, माजी सरपंच सौ.ज्योती रामेश्वर कोकाटे, नागनाथ दहिवडे, परमेश्वर कोकाटे, बबन कोकाटे , धोंडीराम मुंडे, दत्ता काळे आदी उपस्थित होते.
No comments