Breaking News

पाण्याने पडझड आणि वाहून गेलेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत द्या- जयदत्त धसके. के. निकाळजे ।  आष्टी 

तालुक्यात यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावलेली असून यामुळे तालुक्यातील सर्वच धरणे ओसंडून वाहता आहेत.माञ याच अति पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड देखील झालेली असल्याचे विदारक चिञ आहे.

तालुक्यातील देविनिमगाव येथील  बाळु मोरे,पोपट मोरे,बाबा माळी, बाळु बर्डे, महादेव भगवान माळी,या नागरिकांची घरे गावच्या नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडल्याचे चिञ आहे.याच पार्श्वभूमीवर त्या घरांची युवानेते जयदत्त धस यांनी पाहणी करुन पडझड झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करुन त्या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगत प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.यावेळी जयदत्त धस यांच्यासह बिटु पोपळे,प्रल्हाद मडके उपसरपंच रमेश गावडे, संदीप मार्कंडेय आदी उपस्थीत होते.


No comments