नाव राष्ट्रीय महामार्ग पण दर्जा गाडीवाटेचा...!
खामगाव सांगोला महामार्गाचे पूल धोकादायक : बांधकामाचा दर्जा आणि समपातळीचा अभाव
गौतम बचुटे । केज
खामगाव-सांगोला या महामार्गा वरील पूल हे धोकादायक असून यात कामाचा दर्जा आणि आणि त्याची समपाताळी राखली गेली नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
या बाबतची माहिती अशी की, खामगाव-सांगोला या नवीन महामार्गावर काम पूर्ण झालेल्या व काम सुरू असलेल्या टप्प्यातील पुलाचे बांधकाम हे अत्यंत सुमार दर्जाचे झालेले आहे. यात समपातळी राखली गेली नाही. तसेच पुलावरील काँक्रीटचे काम करताना त्याला व्हाब्रेटर वापरले नसल्याने चढ उतार व उंच सखलपणा निर्माण झालेले आहेत. त्यामुळे भरधाव वेगाने जाणारे वाहन आदळत आहे. त्यामुळे अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटून जिवीतहानी होऊ शकते. तसेच मोटार सायकलवर मागे बसलेले व लहान मुले, महिला व वृद्ध यांना त्रास आणि अपघात होण्याची शक्यता आहे.
महामार्गाच्या कामावर अद्यावत यंत्र सामग्री आणि सर्व आधुनिक यंत्रणा असतानाही महामार्ग प्राधिकरण एवढे निष्काळजी कसे? याची चर्चा आहे.
No comments