Breaking News

पार्वती फुटके यांचे दुःख निधन


परळी वैजनाथ : येथील शास्त्रीनगर येथील रहिवासी पार्वती गणपतअप्पा फुटके (वय ८७) यांचे रविवारी (दि.११) सकाळी सात वाजता दिर्घ आजाराने दुखःद निधन झाले आहे.

               

येथील पार्वती गणपतअप्पा फुटके या पाच ते सहा महिन्यापासून आजारी होत्या. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. रविवारी सकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले. पार्वती फुटके अत्यंत धार्मिक होत्या.धार्मिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असत.पार्वती फुटके यांच्यावर येथील विरशैव लिंगायत स्मशानभूमीत दुपारी एकच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. बसलींग, भीमाशंकर फुटके यांच्या आई होत्या.


No comments