Breaking News

नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर उपोषणस्थळी

 बीड :  गेल्या चार दिवसांपासून हिरालाल चौकात शिवसंग्रामचे माजी नगरसेवक दत्ता गायकवाड हे पेठ बीडमधील रखडलेल्या रस्ता दुरुरस्तीच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. त्यांच्या या आंदोलनास विविध सामाजिक - राजकीय पक्षांचा पाठींबा मिळत आहे.  दरम्यान आज नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर उपोषणस्थळी पोहचले असून उपोषणकर्त्याशी ते संवाद साधत आहेत. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरवात होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही असा पवित्रा उपोषणकर्ते दत्ता गायकवाड यांनी घेतला आहे. 
No comments