Breaking News

हाथरस येथील अत्याचाराच्या निषेधार्थ आज शिवसेना महिला आघाडीकडून कॅन्डल मार्चबीड,दि.5(): हाथरस जिल्ह्यातील चंद्रप्पा परिसरातील 19 वर्षीय मनीषा वाल्मीक सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. हे प्रकरण फास्ट कोर्टात चालवावे या सर्व मागणी करत आणि त्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवार दि. 06 सप्टेबर रोजी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संगिताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले आहे.

दिवसेंदिवस महिला व मुलींवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. तरी यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि हाथरस जिल्ह्यातमील चंद्रप्पा परिसरातील झालेल्या मुलीवरी सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कॅन्डल मार्चचे करण्यात आले आहे तरी झालेल्या घटनेचे निषेध करण्यासाठी जास्तीत जास्त महिला भगिनीनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


No comments