Breaking News

शिरुर तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाची स्थापना

 


-अध्यक्षपदी पत्रकार गाडेकर सचिवपदी पवार

शिरुर : अखिल भारतीय वारकरी मंडळाची शिरुर तालुका कार्यकारिणी स्थापन करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी पत्रकार विजयकुमार गाडेकर यांची तर सचिवपदी पत्रकार गोकुळ पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुका उपाध्यक्ष म्हणून हभप चंद्रकांत थोरात आणि हभप गोविंद पाटील गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर संस्थानचे महंत हभप स्वामी विवेकानंद शास्त्री प्रदेशाध्यक्ष हभप अनिल महाराज वाळके मराठवाडा संपर्क प्रमुख हभप अर्जुन महाराज उगले जिल्हाध्यक्ष हभप हरिदास भाऊ जोगदंड पाथर्डीचे तालुकाध्यक्ष हभप विठ्ठल महाराज सोनाळे यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर संस्थान सभागृहात तालुका कार्यकारिणी सदस्यांना नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यकारिणी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या असून प्रत्येक समितीवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वश्री हभप ज्ञानदेव खेडकर, भगवान तळेकर, मारुती वीर, बंडू जरांगे, गोरख खेडकर, भरत जाधव, उद्धव काळे, सुधाकर नागरे, रामनाथ खेडकर, भाऊसाहेब नेटके, भास्कर मुळे, अंबादास बडे, मयुरी राजहंस, नारायण शेळके, कौशल्या राऊत, मधुकर बांदल, अजिनाथ फरताडे, गीता लाड, जगन्नाथ कदम, रामनाथ कांबळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.No comments