Breaking News

निर्भीड पत्रकार संघाच्या बीड शहराध्यक्षपदी एस. एम. युसूफ यांची निवड


बीड : 
पत्रकार एस.एम.युसूफ यांची निर्भीड पत्रकार संघाच्या बीड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांचे समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

पत्रकार एस.एम.युसूफ गेल्या सात वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या लेखणीद्वारे अनेक प्रश्नांना वाचा फोडून जनहितास्तव आवश्यक असलेली कामे शासन-प्रशासनाकडून आपल्या लेखणी च्या माध्यमातून करून घेतली आहेत. जनहितासाठी आवश्यक असलेले कार्य करण्यासाठी झपाटल्यागत ते आपल्या लेखणीद्वारे परखड व सडेतोडपणे लेखन करून मांडत असतात. 

सुरुवातीपासून निर्भीड, निष्पक्ष आणि नि:स्वार्थपणे करत असलेल्या पत्रकारितेची दखल घेऊन निर्भीड पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. रुचिता मलबारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष शेख तय्यब यांनी १९ ऑक्टोबर २०२० सोमवार रोजी पत्रकार एस.एम.युसूफ यांना निर्भीड पत्रकार संघाच्या बीड शहराध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली व त्यांचे स्वागत केले. यावेळी साप्ताहिक द स्कुल एक्सप्रेसचे संपादक शेख एजाज़ आणि साप्ताहिक जनशक्ती चे संपादक शेख रेहान यांची प्रमुख उपस्थिती होती.No comments