Breaking News

गंगाई फार्मसी कॉलेज मध्ये ऑनलाईन वाचन प्रेरणा दिन साजरा


के. के. निकाळजे । आष्टी 

आनंद चॅरिटेबल संस्था संचलीत गंगाई फार्मसी कॉलेज कडा येथे भारताचे ११ वे राष्ट्रपती, मिसाईल मँन, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जंयती निम्मीत १५ ऑक्टोबर २०२० रोजी ऑनलाईन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

 

सध्या असलेल्या कोरानाच्या परीस्थिती मुळे विद्यार्थ्यी घरूनच ऑनलाईन अभ्यास करत आहेत त्यासाठी गंगाई फार्मसी कॉलेज चे सर्व शिक्षक हे रोज ऑनलाईन लेक्चर घेत आहेत व तेच लेक्चर विद्यार्थ्यांंना पुन्हा पहाता यावे म्हणुन यु ट्युब वर ही टाकतात.

   त्याच अनुशंघाने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जंयती ही ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.  हा कार्यक्रम दोन भागा मध्ये होता. दुसर्या भागामध्ये दुपारी पुस्तक वाचनाचे महत्व सांगण्यासाठी अमेरीकेतील पोलारीज सॉफ्टवेयर लँब चे सिनीयर व्हाईस प्रिसीडंट राहीलेले व सध्या पुण्यातील विश्वागुरु इन्फोटेक चे एमडी व सीईओ श्री राजेंद्र गांगर्डे यांचा वेबीनार झाला या वेळी त्यांनी सुरुवातीला  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी माहीती दिली त्यांचे काही व्हीडीओ व प्रेशेनटेशन ऑनलाईन दाखवले व त्यांच्या जीवनातील काही उदाहरणे दिली त्यानंतर पुस्तक वाचन किती महत्वाचे हे सांगीतले त्यामध्ये वेगवेगळे पुस्तक वाचाणारा व्यक्ती शंभर आयुष्य जगतो व पुस्तक न वाचणारा व्यक्ती एकच आयुष्य जगतो  हे सांगीतले.

 तसेच अनुभवी होण्यासाठी प्रत्येक वेळेस अनभवच घेण्याची गरज नाही पुस्तक वाचुनही आपण अनुभवी होऊ शकतो. तसेच त्यांनी पुस्तके कोणते वाचावे व कसे वाचावे याचीही माहीती विद्यार्थ्यांना वेगवेगळे उदाहरणे देऊन दिली. यावेळी ९० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वेबीनार चा लाभ घेतला.

        त्याआधी सकाळी प्रथम भागात ऑनलाईन पुस्तक वाचन करण्यात  मध्ये ४२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पुस्तक वाचन केले. ज्या विद्यार्थ्यांकडे पुस्तके नव्हते त्यांच्या साठी कॉलेजने वेगवेगळे ऑनलाईन पुस्तके पी.डी.फ. स्वरुपात विद्यार्थ्यांना पाठवले होते व ऑनलाईन डीजीटल लायब्ररी उपलब्ध करुन दिली आहे

   

      संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरनीय मा. आ. भीमरावजी धोंडे साहेब व श्री. अजय दादा धोंडे यांच्या सांगण्यानुसार विद्यार्थ्यांंचा  सर्वांगिण विकास झाला पाहीजे व आपल्या संस्थेत शिकणारा विद्यार्थ्यी हा उच्च स्थानापर्यंत पोहचला पाहीजे या नुसार या कार्यक्रमाचे नियोजन केले होते व यासाठी मार्गदर्शन संस्थेचे प्रकाशकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, श्री शिवदास विधाते, श्री दत्तात्रय गिलचे, श्री माऊली बोडखे, श्री संजय शेडे, श्री शिवाजी वनवे यांनी केले व कॉलेजचे प्रा. अशोक गदादे , गणेश साबळे , सोनाली साबळे , तान्हाजी गावडे, वैभव घुमरे, अनिकेत डाके, कणसे भाऊसाहेब, सारीका शिंदे, विकास अनारसे यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.


No comments