Breaking News

पिंपळा ग्रामस्थांच्या वतीने डॉ. शिवाजी राऊत सत्कार

के. के. निकाळजे । आष्टी आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या मराठवाडा प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल डॉ.शिवाजी राऊत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष करून महिला भगिनी उपस्थित होत्या पिंपळा येथे डॉ.शिवाजी राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मराठवाडा प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेश उपध्यक्ष डॉ शिवाजी राऊत यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मराठवाडा प्रभारी पदी निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्त पत्र देऊन केली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे कामकाज अहवाल व नवीन तरुण कार्यकर्त्यांना पक्षसंघटनेत बळकटी आणण्यासाठी स्थान देणे यासाठी मराठवाडा विभागाच्या प्रभारी पदी बीड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत यांची निवड करण्यात आली आहे, डॉ.शिवाजी राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.शरद पवार साहेब व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात,त्यांना लवकरच विधान परिषदेत संधी मिळणार असल्याचेही बोलले जात आहे 5 ऑक्टोबर पासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्ममध्ये आपण दौरा करून पक्षसंघटनत बाबत माहिती घेऊन तसा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचेही यावेळी राऊत यांनी पिंपळा येथे बोलताना सांगितले.

या निवडीबद्दल युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व पत्रकार युवराज खटके सरपंच, आकाश लोखंडे, ग्रा.पं.स, चंद्रकांत शेंडगे, मेजर अमर वाळके, आदिनाथ महाराज दिंडे, माणिक भवर, विलास खटके, योगेश शेळके, महादेव शेलार, दत्तू शेळके, शरीफ सय्यद, प्रकाश भिटे, भाऊसाहेब खटके व महिला भगिनी उपस्थित होत्या.No comments