Breaking News

..अखेर आमदार संदीप क्षीरसागर यांनी बळीराजाला दिलेला शब्द पाळला


नुकसान पंचनाम्यासाठी ग्रामस्तरावर तीन सदस्यीय समिती गठीत


बीड : परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान केले. सोयाबीन , कापूस, तूर ही पिके अक्षरशः पाण्यात आहेत. 12 ऑक्टोबर रोजी बीडचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या संदर्भाने संबंधित कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांची समिती गठीत करून पंचनामे करण्याचे काम तात्काळ सुरू करा असे निर्देश बीडचे उपविभागीय अधिकारी, नामदेव टिळेकर व बीड तहसीलदार यांना दिले होते. त्यानुसार शनिवारी जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्षात नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामाला सुरुवात केली आहे. अखेर आमदार संदीप भैय्या क्षीसागर यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला असल्याची भावना बीडचा बळीराजा व्यक्त करत आहे.कधी नव्हे ते यंदा सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाला मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. बीड जिल्ह्यात दोन लाख 40 हजार हेक्टरवर सोयाबीनचे पीक आहे. यापैकी प्राथमिक अंदाजानुसार 70 हजार हेक्टर हून अधिक क्षेत्रावरील सोयाबीनचे पीक परतीच्या पावसाने उध्वस्त केले. याशिवाय 1 लाख हेक्टरवरील कापसाच्या पीकाचे नुकसान झाले आहे. या प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा प्रशासन प्रत्यक्षात नुकसानीचे पंचनामे करणार आहे. 

12 ऑक्टोबर रोजी बीडचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी प्रशासनातील उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर व संबंधित तहसीलदार यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व पंचनाम्यात संदर्भाने समिती गठीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या या निर्देशानुसार प्रशासन तात्काळ कामाला लागले. शनिवारी गावस्तरावर संबंधित कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व तलाठी यांची एक समिती गठीत करून पंचनामे करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले आहेत.


आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला आधार
बीड विधानसभा मतदारसंघात सोयाबीन व कापसाच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकरी आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेले आहेत. मात्र बीडच्या आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे संदर्भात तत्परता दाखवून प्रशासनाला योग्य ते निर्देश वेळेवर दिल्यामुळे आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला आधार मिळाला आहे. अशी स्थिती बीड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळते.No comments