Breaking News

राज्यात नोकर भरतीत पदवीधर अंशकालीन उमेदवारांना प्रथम प्राधान्य


शासन परिपत्रक अंशकालीन  संघटनेच्या प्रदेशअध्यक्षा श्रीमती रेखा विनायक आहेरराव यांनी केले स्वागत 

शेख कासम । कडा 

राज्यातील पदविधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून नोकरीची संधी उपलब्ध करूण देण्याकरीता मंत्रीमंडळाने दि.11.12.2018 च्या बैठकीत मंजूर असलेल्या आस्थापनेवरील रिक्त पदावर नेमणूका करावयाच्या प्रचलित धोरणामधून पदविधर अंशकालीन उमेदवांराना सूट देऊन वैयक्तिकरित्या प्राधान्याने नेमणूक देण्याबाबत निर्णय घेतला व नियुक्ती देण्याकरीता अनुसरवयाची कार्यपध्ती काैशल्य विकास व उद्योजकता विभागाने 02.03.2019 च्या शासन परिपत्रकान्वये विहित केला आहे. 

तथापि विविध विभागाकडून बाह्य़ यंत्रणेद्धारे सेवा घेताना पदवीधर अंशकालीन उमेदवारांचा विचार होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे वित्त विभाग शासन परिपत्रक 30 सप्टेंबर 2020 अन्वये सुचना केल्यानुसार राज्य शासनाच्या व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयीन आस्थापनेवर तसेच शासन अनुदानित (संस्था) व राज्यातील पीपीपी तत्वावर सुरु असलेल्या प्रकल्पामध्ये ज्या पदांच्या सेवा वैयक्तिकरित्या संस्था/ ठेकेदारांकडून घेण्यात येतात अशा लिपिक , टंकलेखक, शिपाई, वाहनचालक या सारख्या  कार्यालयाच्या कामकाजाशी प्रत्यक्ष संबध येणाऱ्या कुशल पदांचा सेवा बाह्य़ यंत्रणेद्धारे संस्था/ ठेकेदारामार्फत घेण्यापूर्वी अशा सेवा प्रथम पदविधर अंशकालीन  उमेदवारांमधून घेण्यात याव्यात करिता काैशल्य विकास व उद्योजक्ता विभागाच्या दि.02 मार्च 2019 च्या शासन परिपत्रकान्वये विहित केलेली कार्य पध्दती अनुसरावण्याच्या बाबत वित्त विभागाने 30 सप्टेंबर 2020 च्या शासन परिपत्रकान्वये आदेशित केल्यामुळे राज्यातील पदविधर अंशकालीन उमेदवारांचे भविष्य उज्वल होणार असल्याने राज्य संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती रेखा विनायकराव आहेरराव यांनी आनंद व्यक्त करुन शासन परिपत्राचे स्वागत केले आहे.
          या निर्णयाचे बीड जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिंलिद भोले, श्रिराम शेजाळ, उमेश कांबळे, संघमित्र धन्वे, बबन लोंढे, पत्रकार शेख कासम, कैलास कदम,जगताप भागवत, गाैतम आजबे, गाडेकर भागवत, राजाभाऊ धायजे, आगे रमेश, बनसोडे आसाराम, चिरके अरविंद,  आैतरी मनोहर, बचुटे जोतीराम, झाडबुके रमेश, सुरेश सांवत, सुनिल गायकवाड, अॅड. सुरेखा हारके, वंदना गायकवाड, कुसुम पवार आदिनी स्वागत केले आहे.

No comments