काकुंची शिकवण मला कार्याची प्रेरणा देत राहते-आ.संदिप क्षीरसागर
आ. संदिप क्षीरसागर यांनी केले सहकुटुंब काकूंना अभिवादन
बीड : क्षीरसागर कुटुंबात जन्माला आल्यानंतर काकूंच्या विचारसदार म्हणून वावरतांना त्याचा जनहिताचा व जनकल्याणाचा वारसा जोपासण्याची संधी मला मिळते हे माझे भाग्य असून काकूंची ही शिकवण मला कार्याची प्रेरणा देत राहते. आपण समाजाचे देणे लागतो आणि त्यामुळे त्यांच्यासाठी अविरतपणे कार्य करणे ही आपली जबाबदारी असल्याचे आ.संदिप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. आज काकूंचा स्मृती दिन या निमित्ताने आ.संदिप क्षीरसागर यांनी त्यांच्या स्मृती स्थळावर पुष्पहार अर्पण करून पुजन करत अभिवादन केले.
यावेळी पुढे बोलतांना आ.संदिप क्षीरसागर म्हणाले की, माझ्या सर्व पुरवजांच्या आशिर्वादाने व आपल्या सर्वांच्या साथीने सुरू असलेला सामाजिक हिताचा व जनकल्याणाचा प्रवास अविरत सुरू राहावा हीच माझी इच्छा आहे. समाज हिताचा त्यांचा वारसा जपण्याचे बळ व पात्रता माझी अंगी यावी हीच माझी प्रार्थना असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, माझी आजी म्हणजे आपल्या सर्वांच्या काकू माझ्या प्रेरणास्थान आहेत आणि त्यांची शिकवण ही माझ्या जीवनाची दिशादर्शक आहे. आजही सर्व लोक त्यांचे नाव आदराने घेतात आणि त्यांच्या कर्तृत्वाची थोरवी गात असतात. त्यांचे सर्व गुण हे माझ्या अंगी रूजवावे व माझ्याकडून अविरत जनसेवा व्हावी हा माझा ध्यास आहे. काकूंनी इथल्या मातीशी आणि बीडच्या सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली माणसं माझ्या प्रत्येक सुख दु:खात सहभागी असतात. मी करत असलेले प्रत्येक काम ते नक्कीच त्यांनी मला दिलेली सद्बुद्धी व आशिर्वादाचे फळ म्हणता येईल असे आ.संदिप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यावेळी रविंद्र क्षीरसागर, रेखाताई क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर व सह कुटुंब उपस्थित होते.
No comments