Breaking News

सरकार थट्टा थांबवा, तात्काळ शेतकऱ्यांना थेट खात्यावर पिकांची नुकसान भरपाई द्या -आ. विनायक मेटे
खांडे पारगाव परिसरात तहसीलदार समवेत केली पीक नुकसान पाहणी

बीड :  परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन सडून गेली,कापसाच्या पावसामुळे वाती झाल्यात बोड सडायला सुरवात झाली अनेक ठिकाणी ऊस भुईसपाट झाला आहे,तुरीचे पीक करपून जात आहे.शेतकरी अतोनात नुकसानाने हवालदिल झाला आहे. तरीही सरकार झोपेचं सोंग करत आहे. सरकारने शेतकऱ्याची कुचेष्टा,थट्टा थांबवावी तात्काळ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई थेट शेतकऱ्याच्या खात्यावर देण्यात यावे असे आ.विनायकराव मेटे यांनी दुसऱ्या दिवसाच्या शेतकरी पीक नुकसान पाहणी दौऱ्यात खांडे पारगाव येथे शेतकऱ्यांशी सवांद साधताना म्हंटले. बीडचे नूतन तहसीलदार शिंदे, तालुका कृषी अधिकारी गंन्डे यांच्या समवेत पाहणी करण्यात आली.
     

आ विनायकराव मेटे यांनी परवा शिरूर कासार तालुक्यात तर काल बीड तालुक्यात नुकसान पाहणी दौरा केला. बीड तालुक्यातील खांडे पारगाव येथे बांधावर जाऊन आ मेटे यांनी नुकसान पाहणी केली.  परतीच्या पावसाने राज्यात बऱ्याच ठिकाणी प्रचंड नुकसान केलेले आहे. शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेली पिके अक्षरश वाहून गेली आहेत. पंचनामा करण्यासाठी शेतात पिके राहिले नसल्याची गंभीर परिस्थिती सध्या आहे. शेतकऱ्यांवर एक अस्मानी संकट आलेले असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नसल्याचे दिसत आहे.
          

या वेळी आ.विनायकराव मेटे,तहसीलदार शिंदे, तालुका कृषी अधिकारी गंन्डे, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, शिवसंग्रामप्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार, मुकादम संघटनेचे अध्यक्ष बबन माने, प.स. माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, सरपंच आसाराम आमटे, माजी सभापती सखाराम ठोकळ, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे , सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष अक्षय माने, सरपंच गणेश साबळे, सरपंच मसुराम सोळुंके, सुनील धयजे, रुद्र मकले, सखाराम ठोकळ, उपसरपंच सुभाष सपकाळ, उपसरपंच विश्वाभर सपकाळ, गोरख पाटील, बबन आबा आमटे, विश्वास पाटील, नितीन आमटे, चेअरमन बाबूलाल सय्यद, अरुण आमटे, खाजभाई पठाण, वरसकीत साळुंके, बाळू सोळुंके, सचिन आमटे, नवनाथ सपकाळ, सुग्रीव आमटे, राजू करपे, विठ्ठल आमटे, ज्ञानेश्वर वैध, सदीपन ठोकळ, बाबू सपकाळ आदी शेतकरी उपस्थित होते.

No comments