Breaking News

रासपच्या महाराष्ट्र मुख्य महासचिवपदी बालासाहेब दोडतले यांची नियुक्ती

                               


  
बीड : मुंबई येथील मरीन ड्राईव्ह येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता झालेल्या रासपच्या राष्ट्रीय बैठकीत   बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील चतुरवाडी येथील राहिवासी  व धनगर समाजातील जेष्ठ  नेते बालासाहेब प्रभाकर दोडतले यांची रासपचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी  रासपच्या महाराष्ट्र मुख्य महासचिवपदी  नियुक्ती केली आहे. 
 

महाराष्ट्रात रासपच्या स्थापनेपासुन   बालासाहेब दोडतले हे  सक्रीय  आहेत . पक्षातील त्यांचे उल्लेखनीय कार्य पाहुन त्यांची मुंबई येथील   शुक्रवारच्या राष्ट्रीय बैठकीत रासपच्या मुख्य महासचिवपदी  निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष सिध्दप्पा अक्कीसागर ,प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची विचारधारा महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणसापर्यंत घेवुन जाणार असुन भविष्यात रासपशिवाय  अन्य कोणत्याही पक्षाला राज्यात सत्ता स्थापन करता येणार नाही यासाठी  पक्षाची संघटनात्मक बांधणी करणार असल्याची प्रतिक्रिया बालासाहेब दौडतले  दिली आहे. No comments