Breaking News

धनगर समाजावर अन्याय झालेला सहन करणार नाही - इंजि. विष्णू देवकातेयुवा मल्हार सेनेच्या 
धुळे जिल्ह्यात ३ शाखांचे इंजि. देवकते यांच्या हस्ते थाटात उदघाटन 

बीड :  धनगर समाजावर कोणी अन्याय केल्यास युवा मल्हार सेना संघटना कदापिही सहन करणार नाही. समाजाच्या न्याय - हक्कासाठी व अन्याया अत्याचाराविरुद्ध विरुद्ध महाराष्ट्रभर आंदोलन करून युवा मल्हार संघटना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत राहील. अशी ग्वाही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. विष्णू देवकते यांनी दिली. 

धुळे जिल्ह्यात तीन ठिकाणी युवा मल्हार संघटनेच्या शाखेचे उदघाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. देवकते यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्षराजू शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब सापनकर, उत्तर महाराष्ट्र उपध्यक्ष कैलास गदै, उत्तर महाराष्ट्र युवक प्रदेशध्यक्ष धनराज सरगर,  उपाध्यक्ष मनोज पिसे,  जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर,  बीड जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब मतकर, तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 


  

इंजि. देवकते म्हणाले की, एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात संघटनेतील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊन लवकरच महाराष्ट्रभर आंदोलनास सुरवात करण्यात येईल.  धुळे जिल्हात ठेलारी समाजाच्या हिताच्या कामासाठी संघटना कायम तत्पर राहील. जर का कोणाकडून ही ठेलारी धनगर मेंढपाळ बांधवांवर अन्य अत्याचार केल्यास त्याची गय केली जाणार नाही. समाजच्या हितासाठी व न्याय हक्कासाठी युवा मल्हार सेना संघर्षरत असून अन्याय - अत्याचारा विरुद्ध राज्यभर आंदोलन करून मेंढपाळ समाजाला न्याय देण्याचे काम करत राहिलं, असा विश्वास इंजि. देवकते यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

या समाज प्रबोधन व शाखा उद्घाटन प्रसंगी युवा मल्हार सेनेचे आंबा वडगर, सागर शेळके, आकाश शिंदे, बबलू गडदरे, संजय सरग, ज्ञानेश्वर कोळेकर, रमेश वाघमोडे, संदिप बोरकर, राज धनगर, भिला कोळेकर, प्रशांत बोरसे, अरविंद धनगर, आकाश मंचरे, सोमनाथ लोने, भुषण धनगर, शंकर चोपडे, भटु बिचकुले, अल्पेश महानोर, विकास महानोर, वाल्मीक धनगर, प्रमोद धनगर, विनोद धनगर, रघुनाथ बुरुंगले, सुरेश थोरात, सुरेश सरग, भटु पाटील यांच्यासह पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments